गोल पोस्ट राष्ट्रीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार देशवासियांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार देशवासियांशी संवाद

नवी दिल्ली, १० ऑक्टोबर २०२० : पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या २५ तारखेला आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत.

या कार्यक्रमाचा हा ७० वा भाग आहे. या व्यासपीठामुळे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिकांची प्रेरणापूर्ण वाटचाल जाणून घेण्यास मदत होते तसेच सामाजिक परिवर्तनासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या उपक्रम आणि योजनांबाबत चर्चा करता येते, असं मोदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

आपले विचार आणि कल्पना नमो अॅप किंवा माय जी ओ व्ही या खुल्या मंचावर पाठवाव्यात असं आवाहनही मोदी यांनी केलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version