नवी दिल्ली, १२ जुलै २०२३ : फ्रान्सचा दौरा आटोपल्यानंतर परतताना १५ जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिरातला जाणार आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. १३ आणि १४ तारखेला मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर असतील. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून मोदी त्या देशाच्या नॅशनल डे परेडमध्ये सामील होणार आहेत.
फ्रान्स दौऱ्यावेळी २६ राफेल-मरिन फायटर विमाने, तसेच स्कॉर्पिन कलावरी पाणबुड्या खरेदी करण्याबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. फ्रान्स दौऱ्यावरून परतत असताना १५ तारखेला नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिरातला जातील.
या देशाचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांची मोदी भेट घेणार आहेत. गतवर्षी जर्मनीत झालेल्या जी ७ परिषदेहून परत येताना, नरेंद्र मोदी हे संयुक्त अरब अमिरातला गेले होते. त्यावेळीही मोदी यांनी नाह्यान यांची भेट घेतली होती.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर