गोल पोस्ट राष्ट्रीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज दिल्लीत ‘रोड शो’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज दिल्लीत ‘रोड शो’

नवी दिल्ली , १६ जानेवारी २०२३ पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१६ जानेवारी) दिल्लीमध्ये रोड शो करणार आहेत. भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी दिल्लीमध्ये होत असून, त्याच्या पहिल्या दिवशी मोदींचा हा रोड शो होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी तीन वाजता संसद मार्गापासून याची सुरुवात होणार असून, मोदी यांचा रोड शो एक किलोमीटरचा असेल. दरम्यान, मोदींच्या या रोड शोसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये अशोका रोड (विंडसर प्लेस ते जयसिंग रोड जीपीओ दोन्ही कॅरेज वे), संसद मार्ग, टॉलस्टॉय रोड (जनपथ ते संसद मार्ग), रफी मार्ग (रेल भवन ते संसद मार्ग), जंतर मंतर रोड, इम्तियाज खान मार्ग आणि बांगला साहिब लेन आदी रस्ते दुपारी अडीच ते पाच वाजेपर्यंत बंद राहतील.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version