प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण यांच्या चार ग्रंथांचे २६ ला प्रकाशन

कोल्हापूर,२१ फेब्रुवारी २०२४ : निर्मिती प्रकाशन, प्रकाशित ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण लिखित, संपादित आणि अनुवादित मराठी कादंबऱ्यातील मुस्लीम समाजजीवनावर संशोधनात्मक भाष्य करणारे ‘मराठी कादंबर्‍यांतील मुस्लीम समाजजीवन’, महाराष्ट्राच्या जडणघडणीत मूलभूत व भरीव योगदान देणारे ‘महाराष्ट्राचे शिल्पकार मा. यशवंतराव चव्हाण यांचे विचार’, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे विचार तत्वज्ञान स्पष्ट करणारे ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर : व्यक्ती आणि विचार’, भारतीय मुस्लीम समाजाबद्दलची वर्तमान परस्थिती, त्यांचा जीवनसंघर्ष स्पष्ट करणारे ‘भारतीय मुसलमान’ या महत्वपूर्ण संशोधनपर सैद्धांतिक अशा चार ग्रंथांचा प्रकाशन समारंभ सोमवार दि. २६ फेब्रुवारी, २०२४ रोजी सायं. ५:०० वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, मुख्य सभागृह, कोल्हापूर या ठिकाणी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत प्रकाशक अनिल म्हमाने यांनी दिली.

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या प्रकाशन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत व पत्रकार संजय आवटे उपस्थित राहणार आहेत.यावेळी माजी परीक्षा नियंत्रक, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे डॉ. बी. एम. हिर्डेकर, राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय, रुकडीचे प्रा. डॉ. गिरीश मोरे, जयवंत महाविद्यालय, इचलकरंजीचे प्रा. डॉ. रफिक सुरज यांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे.

कवी, लेखक, विचारवंत व साहित्यिकांना प्रकाशन समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण यांनी केले आहे.पत्रकार परिषदेला प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण, प्रकाशक अनिल म्हमाने, डॉ. स्वप्निल बुचडे, डॉ. पांडुरंग पाटील, प्रकाशिका डॉ. शोभा चाळके, पुजा जाधव, नामदेव मोरे, अरहंत मिणचेकर, सई कांबळे, अश्वजित तरटे, रणजित कांबळे उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा