कर्तव्याला प्राधान्य देत आमदार सरोज वाघ-अहिरे अडीच महिन्यांच्या चिमुकल्यासह विधान भवनात!

4

पुणे, १९ डिसेंबर २०२२ : नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन आजपासून (ता. १९) सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या आमदार सरोज वाघ-अहिरे या अडीच महिन्यांच्या चिमुकल्याला घेऊन विधान भवनात पोचल्या.

मी आई आहेच, सोबतच आमदारही आहे, त्यामुळे दोन्ही कर्तव्ये महत्त्वाची आहेत. बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही, सोबत मतदारसंघातील लोकांचे प्रश्नही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे बाळाला घेऊन यावे लागले, अशी भावना अहिरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

प्रशंसक प्रवीण वाघ असे बाळाचे नाव आहे. ता. ३० सप्टेंबरला त्याचा जन्म झाला. अधिवेशन असल्याने त्या बाळ व पती प्रवीण वाघ यांच्यासह विधान भवनात पोचल्या. कुटुंबीय बाळाला सांभाळतील त्याचवेळी मी सभागृहात मतदारसंघातील प्रश्न मांडणार आहे. अधिवेशन किती दिवस चालेल माहिती नाही, लोकांचे अधिकाधिक प्रश्न सोडविण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा