काँग्रेस गटनेते अंधीर रंजन चौधरींचे निलंबन मागे घेण्याची शक्यता, विशेषाधिकार समितीचे एकमत

नवी दिल्ली, ३० ऑगस्ट २०२३ : काँग्रेस गटनेते अंधीर रंजन चौधरी यांचे लोकसभेतील निलंबन मागे घेण्याचा निर्णय संसदेच्या विशेषाधिकार समितीने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चौधरी यांचे सभागृहातील वर्तन आणि वक्तव्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. चौधरी यांचे निलंबन मागे घेण्यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांच्याकडे विचारार्थ पाठवला जाईल, असे सांगण्यात आले आहे.

आज चौधरी यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी विशेषाधिकार समितीने बोलावले होते. विशेष म्हणजे समितीतील भाजप खासदारांनी देखील चौधरी यांचे निलंबन मागे घेण्याच्या निर्णयाचे समर्थन केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. एकदा सदस्यांकडून वापरण्यात आलेले शब्द जेव्हा सभागृहाच्या कामकाजात उपयुक्त नसतात, तेव्हा ते कामकाजातून काढून टाकले जातात.

चौधरी यांची बाजू ऐकल्यानंतर समितीने त्यांचे निलंबन मागे घेण्याच्या शिफारसी संबंधी प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यासंबंधी समितीकडून १८ ऑगस्टला विचार करण्यात आला होता. या बैठकीत स्वाभाविक न्याय सिद्धांताच्या आधारे चौधरी यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान निलंबित करीत त्यांना दंडित करण्यात आले आहे. पुन्हा अशाप्रकारचा दंड देणे योग्य नाही, असे मत समितीने व्यक्त केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा