प्रियदर्शन -अक्षय जोडी पुन्हा एकत्र

मुंबई: कॉमेडी चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले चित्रपट निर्माते व दिग्दर्शक प्रियदर्शन आणि अभिनेता अक्षय कुमार हे समीकरण मागील काही वर्षांमध्ये चित्रपटसृष्टीत दृढ झाले आहे.
आता पुन्हा हि जोडी एकत्र येत नवीन चित्रपट घेऊन येत आहे.
प्रियदर्शन अक्षयला घेऊन पुढच्या वर्षी एका नव्या चित्रपटाच्या कामाचा शुभारंभ करणार आहे. साधारण सप्टेंबर-ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होईल असे प्रियदर्शन यांनी सांगितले.
चित्रपटात अक्षयसोबत कोण झळकणार तसेच चित्रपटाचे नाव काय असेल या गोष्टींचा खुलासा प्रियदर्शन यांनी अद्याप केला नाही. मात्र या आगामी चित्रपटाची नेटकऱ्यांमधून प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे.
प्रियदर्शन-अक्षयचे चित्रपट : हेराफेरी, गरम मसाला, भूलभुलैय्या, दे दणादण, भागमभाग हे अक्षयसोबत केलेले प्रियदर्शन यांचे चित्रपट तुफान यशस्वी झाले होते. सध्या प्रियदर्शन ‘हंगामा-2′ च्या तयारीत व्यस्त आहे.
२००३ मध्ये आलेल्या चित्रपटाचा हा सिक्‍वल नसल्याचे प्रियदर्शन यांनी सांगितले आहे. या चित्रपटातून शिल्पा शेट्टी बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा