प्रियांका चोप्रा ने केले पती निक आणि कन्या मालती सोबत दिवाळी सेलिब्रेशन

पुणे, २७ ऑक्टोबर २०२२ : लेकीसोबत दिवाळी साजरी करतानाचा एक फोटो निकने आणि अभिनेत्री प्रियंका चोप्राने सोशल मीडियातून शेअर केला आहे. प्रियांका आणि तिचा पती निक जोनास ने त्यांची कन्या मालती मेरी सह पहिली दिवाळी साजरी केली.

प्रियांका आणि निक यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. माझ्या प्रियजनांसह दिवाळीचे सुंदर सेलिब्रेशन असे कॅप्शन देत, दोन फोटो शेअर केले आहेत. दोन्ही फोटोत निक, पत्नी प्रियंका आणि मुलगी मालती मेरीसह दिसतो.आपल्या लेकीसोबतच्या पहिल्या दिवाळीचा फोटो शेअर करताना तिचा चेहरा दिसू नये यासाठी तिच्या चेहऱ्यावर लाल रंगाचे हार्ट इमोजी त्यांनीे टाकलेले होते. त्यामुळे या लोकप्रिय कपलच्या मुलीचा चेहरा मात्र अजूनही लोकांसमोर आलेला नाही.

पिच कलर मधल्या भारतीय पारंपरिक पेहरावात, प्रियंकाने लेहंगा तर निकने कुर्ता आणि पायजमा परिधान केलेला होता. तर कन्या मालती मेरीला पारंपरिक पद्धतीने शिवलेला गाऊन घातलेला होता. सोबत प्रियंकाची आई सुद्धा या सेलिब्रेशन मध्ये सामील झाली होती. सम्पूर्ण चोप्रा-जोनास कुटुंब या क्षणी आनंदात दिसत होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा