गोल पोस्ट राष्ट्रीय प्रियंका गांधींना स्कुटीवर बसवणे पडले महागात

प्रियंका गांधींना स्कुटीवर बसवणे पडले महागात

लखनऊ : काँगेस पक्ष्याच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांना स्कूटीवर घेऊन जाणाऱ्या काँग्रेस नेत्याला पोलिसांनी हेल्मेट न घातल्याप्रकरणी ६१०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निषेधार्थ अटक झालेल्या निवृत्त आयपीएस अधिकारी एसआर दारापुरीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी प्रियंका गांधी शनिवारी(दि.२८) लखनऊ पक्ष मुख्यालयातून रवाना झाल्या होत्या. त्यांना पोलिसांनी लोहिया चौकात अडवले होते. प्रियंका गांधी वड्रा यांनी शनिवारी पोलिसांवर गळा दाबण्याचा गंभीर आरोप केला होता. सुधारित नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात (सीएए) झालेल्या हिंसाचारात अटक झालेल्या आयपीएस अधिकाऱ्याला भेटण्यासाठी प्रियांका गांधी गेल्या होत्या.
पोलिसांनी प्रियंका गांधींनी लावलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version