पुणे, २६ डिसेंबर २०२०: पूज्य साने गुरुजी जयंतीनिमित्त राष्ट्र सेवादल आयोजित चित्रकला, निबंध, कथाकथन अशा विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ त्याचप्रमाणे साने गुरुजींचे आंतरभारती व समताधिष्टीत समाजाचे स्वप्न पुढे नेणारे राष्ट्र सेवादलाचे प्रथम अध्यक्ष “साथी यदुनाथ “या संजय रेंदाळकर संपादित पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्र सेवादल संचालित प्रशासक मंडळाच्या सचिव मा वर्षाताई गुप्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत साने गुरुजी यांच्या जयंतीदिनी पार पडले.
यावेळी व्यासपीठावर शालेय समिती अध्यक्षा मा वंदनाताई आपटे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक निलेश निंबाळकर, साधना शिंदे, रावसाहेब पटवर्धन विद्यालय व ज्युनिअर काॅलेजच्या प्राचार्या वृंदा हजारे, साने गुरुजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती भिलारे, साने गुरुजी बालक मंदीर मुख्याध्यापिका रेखा शिंदे, शिक्षकेतर संघटना कार्यवाह शिवाजी खांडेकर, दिलीप भिकूले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्या मा वर्षाताई गुप्ते यांनी सद्य स्थितीत साने गुरुजींचे विचार किती प्रेरक ठरत आहेत हे सुरू असलेल्या किसान अंदोलनाचा दाखला देत सर्वांना सांगितले व साथी यदुनाथ यांच्या सोबत काम करायला मिळाले याबाबत मी स्वतःला भाग्यवान समजते असे गौरवोद्गार काढले.
वंदनाताई आपटे यांनी मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून उदाहरणांच्या सहाय्याने पालकांशी सुंदर संवाद साधला. यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते साने गुरुजी प्राथमिक शाळेतील व रावसाहेब पटवर्धन विद्यालयतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. महासचिव मा अतूलजी देशमुख यांनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मोलाची मदत केली. प्रास्ताविक मुख्याध्यापिका ज्योती भिलारे यांनी केले, आभार मीना काटे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोपान बंदावणे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र पवार, गीता पिटला, संगिता गोवळकर, संजय ससे, तेजस्विनी फूलफगर, विठ्ठल शेवते, लक्ष्मी कांबळे यांनी परिश्रम घेतले.
बक्षीसपात्र विद्यार्थी –
ईश्वरी कोलते, विरा ठाकर, चैत्राली भरणे, श्रेयस म्हस्के, आदिती तुळसे, गायत्री आयवळे, पायल गुरव, सिद्धी रोकडे, तनुजा गरड, यश बागणे, आर्यन मोरे, श्रेया कदम, आदित्य इंगळे, सिद्धिका घोंगडे, वैभव जाधव, श्रोयोग जाधव.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे