पुणे, ३ मार्च २०२१: सध्याच्या काळात जीवनशैली बदलली आसल्यामुळे अनेक विकार होताना दिसत आहेत आणि या मधे ही तरूणींमधील हार्मोनल असंतुलनाचे प्रमाण आता वाढलेले आहे. सध्या अनेक तरूणींमधे या संबंधीचे विकार असल्याचे दिसून आले आहे. असं असताना ही अनेक तरूणींना याची कारणे आणि परिणाम माहिती नसतात. ज्या बद्दल आपण जाणून घेणार आहोत.
जागृत व्हा…..
अनेक महिला खास करून काम करणार्या वर्गातील महिला स्वताची काळजी फार क्वचितच घेतात. त्यांना एखादी समस्या जाणवू लागली ती त्याकडे त्या दुर्लक्ष करतात. अशावेळी महिलांना यासंबंधीच्या उपाराच्या पर्यायाची जाणीव असणे महत्वाचे आहे.ज्यामुळे त्यांना पुढे मोठ्या आडचणींचा सामना करावा लागू नये.
महिलांमधील हार्मोन्स……
सर्व प्रमुख शरीराची कार्य नियमित करण्यात हार्मोन्सची महत्वपूर्ण भूमिका आसते. जर या हार्मोन्स मधे काही किंचित बिघाड किंवा असंतुलन झाले तर साहजिकच त्याचा परिणाम हा थेट आरोग्यावर होतो आणि अनेक समस्या उद्धवू शकतात.
शरीराचे कार्य आणि हार्मोन्स…..
शरीरातील अनेक कार्य हार्मोन्स नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावतात.त् यात भूक आणि चयापचय, झोप, शरीराचे तापमान, पुनरत्पादन चक्र, लैंगिक कार्य आणि मनःस्थिती आशा अनेक प्रक्रियेवर हार्मोन्स नियंत्रण ठेवते.
कारणे…..
महिलांमध्ये एस्ट्रोजेन आणि प्रेजेस्टेराॅन हे दोन सर्वात महत्त्वाचे हार्मोन्स आहेत. जेव्हा या दोन हार्मोन्सचे प्रमाण सामान्य पातळी पासून विचलित होते, तेव्हा असंतुलन उद्भवते. तरूण स्त्रियांमधे हे कुपोषण, अत्याधिक पोषण, अनियमित जीवनशैली, गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन, थायराॅइड समस्या, ताण तणाव इत्यादी मुळे होऊ शकतो.
हार्मोनल असंतुलन पणाची लक्षणे….
वेदनादायी मिसिक पाळी
अनियमित मासिक पाळी
मूड बदलत राहणे
तणाव-उदास राहणे
अपूरी झोप
अचानक वाढनारे वजन
त्वचेच्या समस्या
प्रजनन समस्या
डोकेदुखी
योनीमार्ग कोरडा होणे
ही असंतुलित हार्मोन्सची काही लक्षणे आहेत.
आरोग्य विषयक तज्ञांचा सल्ला घ्या……
जर या पैकी तुम्हाला कोणतेही लक्षणे आढळल्यास आपण वैद्यकीय तज्ञांन कडून सल्ला घ्यावा. तसेच तपासणी करून उपचार घ्या. संतुलन आणि आपले चांगले आरोग्य पुन्हा सुरळीत करण्यासाठी यामध्ये औषधे किंवा पूरक थेरेपी,जीवनशैलीत बदल करणे हा देखील एक उपचार असू शकतो.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव