रत्नागिरी ३ डिसेंबर २०२३ : पहिल्या प्रगतीशिल साहित्य संमेलनाला रत्नागिरी येथे प्रारंभ झाला असून रत्न नगरीत राज्यभरातील साहित्यिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. शहरातील एसपी हेगशेटे कॉलेजच्या पटांगणामध्ये या साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. डॉक्टर अलीमिया पारकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन पार पडले. यावेळी अभिजीत हेगशेटये, प्रमोद मुनघाटे, महेंद्र कदम,जयश्री बर्वे आदी मान्यवर व साहित्यिक उपस्थित होते.
तीन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनामध्ये राज्यभरातील साहित्यिक सहभागी होणार आहेत. आज साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी राजकारणातील नैतिकता यावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता यामध्ये भालचंद्र कानगो, उद्योग मंत्री उदय सामंत ,आमदार भास्कर जाधव, माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर, खा. इम्तियाज जलील आदी मान्यवरांचा संवाद झाला. या संमेलनाचे अध्यक्ष विजय चोरमारे हे आहेत.
न्युज अनकट प्रतिनीधी : केतन पिलणकर