उंडवडी कडेपठार: डेलोनिक्स सोसायटीच्या बारामती कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये म्होरक्या या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले. यासाठी चित्रपटाचे प्रसिद्ध दिग्दर्शक अमर देवकर यांनी उपस्थिती होती. या प्रमोशनसाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते हे प्रमुख पाहुणे होते.
यावेळी देवकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना हा चित्रपट तयार करत असताना आलेल्या अडचणी व त्यावर केलेली मात या विषयावर भाष्य केले. गावाकडील मेंढ्या राखणारा एक मुलगा जेव्हा प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये लीडर होण्याचे स्वप्न पाहतो व त्यासाठी जी धडपड करतो त्यावर अतिशय गावरान भाषेमध्ये देवकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना विश्वासराव देवकाते यांनी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी झालेल्या प्रामाणिक प्रयत्नाबद्दल देवकर यांचे कौतुक व अभिनंदन केले. दर्जेदार विचारच दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करू शकतात म्हणूनच देवकर हे म्होरक्याची निर्मिती करु शकले असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र देवकाते, विश्वस्त बाळासाहेब कोकरे व सचिव युवराज यादव यांनी म्होरक्याचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्राध्यापक श्रीकृष्ण बावकर, प्रा.अतुल भुजबळ, प्रा.कविता माने, प्रा. दत्तात्रेय कातुरे व प्रा. सचिन जाधव यानी केले.