फिफा विश्वकरंडक स्पर्धेत ‘पठाण’चे प्रमोशन

मुंबई, १४ डिसेंबर २०२२ : शाहरूख खानचा आगामी ‘पठाण’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील गाण्यांची, दीपिकाच्या एंट्रीची चांगलीच चर्चा रंगली आहे. आणि आता त्यातच भर म्हणून फिफा विश्वकरंडक २०२२ च्या अंतिम फेरीत किंग खान ‘पठाण’ या चित्रपटाचे प्रमोशन करणार असल्याची चर्चा समोर आली आहे.

कतारमध्ये जाऊन ‘पठाण’ चित्रपट जागतिक बाजारपेठेत प्रमोट करण्याचा उत्तम मार्ग शाहरूख खानने शोधला आहे. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना १८ डिसेंबर २०२२ रोजी होणार आहे. अर्जेंटिनाने फिफाच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. तर दुसऱ्या संघाची घोषणा अद्यापही व्हायची आहे. दीपिका पदुकोण फिफा विश्वकरंडक २०२२ चा ट्रॉफीचे अनावरण करणार असल्याचीही चर्चा आहे. तर शाहरूख खानचा फॅन पेज ‘Shah Rukh Khan universe fan club’वरून कतारमध्ये शाहरूख खान प्रमोशन करणार असल्याची बातमी समोर येत आहे‌.

‘पठाण’ हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पदुकोण, डिंपल कपाडिया, जॉन अब्राहम, आशुतोष राणा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले आहे. या चित्रपटात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा सामना प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. अशा या दमदार चित्रपटाचे प्रमोशन शाहरूख कतारमधील फायनलमध्ये करतो, की प्री-फायनल टेलिकास्ट टीममध्ये सामील होतो, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा