गोल पोस्ट आरोग्य प्रतिबंधित क्षेत्राचे तातडीने सर्वेक्षण करा: डॉ.सुधीर गुप्ता

प्रतिबंधित क्षेत्राचे तातडीने सर्वेक्षण करा: डॉ.सुधीर गुप्ता

पुणे, दि.८ मे २०२० : कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये तातडीने सर्वेक्षण, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावे, तसेच गरजेनुसार क्वारंटाईन करण्यावर भर द्यावा, अशा सूचना क्रेंदीय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पथकाचे प्रमुख डॉ.सुधीर गुप्ता यांनी केल्या आहेत.

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे पथक पुण्यात दाखल झाले आहे. या पथकाच्या सदस्यांनी आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याशी परिस्थितीविषयी सविस्तर चर्चा केली.

विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ. सुधीर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली कोविड १९ ची वाढत्या रुग्ण संख्येवर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहायक उपमहासंचालक डॉ. मानस रॉय, वरिष्ठ क्षेत्रीय संचालक डॉ. अरविंद अलोणे उपस्थित होते.

यावेळी डॉ. गुप्ता म्हणाले, केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे पथक हे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे व पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करुन पुणे जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा व माहिती घेणार आहे. तसेच पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांची रुग्णालये तसेच ससून, भारती हॉस्पिटल आदी कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना भेटी देवून पाहणी करणार आहोत.

यावेळी डॉ. म्हैसेकर यांनी पुणे विभागातील पुणे शहराबरोबरच सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्हयात वाढत असणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
या बैठकीस आरोग्य उपसंचालक डॉ.संजय देशमुख, आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. आर.एस. आडकेकर उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version