गोल पोस्ट अर्थ उद्योग महाराष्ट्र सरकारने नाभिक समाजाला न्याय द्यावा : पै.अजय रंधवे

महाराष्ट्र सरकारने नाभिक समाजाला न्याय द्यावा : पै.अजय रंधवे

काष्टी,८ मे २०२०: सध्या संपुर्ण देशामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीड ते दोन महिन्यापासून बंद पाहण्यास मिळतं आहे. त्यामुळे नाभिक व्यवसाय अजूनही बंदच ठेवण्यात यावे, हा आदेश महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे.

नाभिक समाज अत्यंत गरीब असून त्यामुळे कारागीर व सलून मालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडलेले असून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत त्यांना राज्य सरकार कडून मिळालेली नाही. त्यामुळे त्यांनी शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

याबाबत रंधवे यांनी कर्नाटक सरकारने जाहीर केलेल्या पाच हजार रुपये प्रत्येकी यांचा दाखला देत महाराष्ट्र सरकारने असाच निर्णय घेऊन समाजाला न्याय द्यावा अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे, अशी माहिती अहमदनगर प्रदेश कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र नाभिक महामंडळ महाराष्ट्र राज्य व युवक जिल्हाध्यक्ष नाभिक महामंडळाचे अध्यक्ष पै.अजय रंधवे यांनी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष

error: Content is protected !!
Exit mobile version