गोल पोस्ट इतर शुभेच्छा अरुण गवळी यांची कन्या योगिता व मराठी अभिनेता अक्षय वाघमारे अडकले विवाह...

अरुण गवळी यांची कन्या योगिता व मराठी अभिनेता अक्षय वाघमारे अडकले विवाह बंधनात

मुंबई, दि. ८ मे २०२०: मुंबईच्या दगडी चाळीतील कुख्यात गँगस्टर अरुण गवळी यांची मुलगी योगिता व मराठी अभिनेता अक्षय वाघमारे यांचा आज ८ मे रोजी विवाह संपन्न झाला आहे. या विवाह सोहळ्यासाठी मुंबई आणि पुणे पोलिसांची विशेष परवानगी घेण्यात आली होती. या दोघांचा हा विवाह २९ मार्च रोजी पार पडणार होता. मात्र , कोरोनामुळे संपूर्ण लॉकडाउन करण्यात आले आणि लग्न लांबणीवर पडले.

याबाबत एका वृत्त वाहिनीशी बोलताना अक्षय वाघमारे याने सांगितले की, आम्ही लग्नाच्या परवानगीसाठी पोलिसांकडे अर्ज केला होता आणि त्यांच्याकडून परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आम्ही ८ मे ही लग्नाची तारीख ठरवली. लग्नाची शॉपिंग आधीच झाली असल्यामुळे फारसा त्रास होणार नसल्याचे ते म्हणाले होते.

मुंबई येथील दगडी चाळीत हा विवाह सोहळा पार पडला आहे. या सोहळ्याला अरुण गवळी देखील उपस्थित होते. या लग्नसोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळले गेले असून सॅनिटायझर आणि फेस मास्क उपस्थित मंडळींना देण्यात आला.

कोण आहे अभिनेता अक्षय वाघमारे?

अक्षय वाघमारेने ‘फत्तेशिकस्त’, ‘बेधडक’, ‘दोस्तीगिरी’, ‘बस स्टॉप’ यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. नुकतीच ‘ती फुलराणी’ या मालिकेतील त्याची भूमिका गाजली होती. अक्षय त्याच्या फिटनेस व्हिडिओसाठी सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. लॉकडाऊनच्या काळातही तो व्यायाम करतानाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version