केंद्र सरकार, UGC, राज्यपाल, विद्यापीठ प्रशासनच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे निषेध आंदोलन

इंदापूर, १९ ऑक्टोबर २०२०: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुरु आहेत. मात्र या परीक्षा सुरु असताना विद्यार्थ्यांना असंख्य प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने परीक्षा पद्धतीतील त्रुटी व विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणी बद्दल पत्रकाद्वारे निषेध नोंदविण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नेते अमरसिंह मारकड यांनी सांगितले.

यामध्ये नियोजनशुन्यता, मॉक टेस्टचा अभाव, कुशल मनुष्यबळाचा अभाव, अपात्रताधारक सर्विस प्रोव्हायडर, हेल्पलाईन केंद्राची अकार्यक्षमता व प्रशासकीय दिरंगाई, MCQ प्रश्नांची प्रश्नपेढी(QUESTION BANK) न पुरवणे यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. ऑनलाईन परिक्षेत प्रश्न कसे असतील याची माहिती नसल्याने विद्यार्थ्यांना ताण येत आहे.

डिव्हाईसचा व कनेक्टिव्हीटीचा अभाव व त्यावर मात केली की ऑनलाईन पेपरचे लॉगइन होत नाही, लॉगइन झाले की पेपर येत नाही आणि पेपर आलाच तर तो सबमिट होत नाही. असे एक ना अनेक समस्या विद्यार्थ्यांना येत आहे. विद्यार्थ्यांना प्रश्न न दिसणे, साईट वर फक्त MCQ चे ऑपशन येत होते. वेळोवेळी विद्यापीठाची साईट क्रॅश होत आहे.
वेबसाईट मध्ये अडचणी आल्यामुळे परीक्षा वेळेवर सुरू होत नाही. विद्यार्थ्यांना कित्येक तास ताटकळत रहावे लागते. परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे विद्यापीठाची हेल्पलाईन सतत व्यस्त लागत आहे.

परीक्षेच्या वेळेवर पेपर ओपन न होता दोन चार तासांनी पेपर सुरु होत आहे. काही विषयांचा पेपर अगदी रात्री उशिरा सुरु होत आहे, तर काही वेळेस तो पुढे ढकलावा लागत आहे.
एकाच दिवशी एकाच वेळी सर्व शाखांचे पेपर न घेता शाखानिहाय वेगवेगळ्या परिक्षा व्हायला हव्या होत्या,त्यामुळे सर्व्हरवर ताण आला नसता. विद्यापीठाने हेल्पलाईन दिलेले संपर्क क्रमांक नंबर सर्वच बंद लागत आहेत.

सदर मुद्दे निवेदनामध्ये नमूद केले असून या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन सक्षम आहे असे वाटत नाही. म्हणून आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने विद्यापीठाच्या या नियोजनशून्य कारभाराचा व ढिसाळपणाचा निषेध केला. तसेच यापुढेही परीक्षा अश्याच पध्दतीने सुरू राहिल्यास आम्ही प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व अहमदनगरचे पक्षनिरीक्षक अॅड अमरसिंह मारकड यांनी दिला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा