गोटाबाया राजपक्षेंच्या राजीनाम्यानंतर आंदोलकांनी गाठले पीएम हाऊस

46

कोलंबो, 13 जुलै 2022: श्रीलंकेतील आर्थिक-राजकीय संकट अधिक गडद होत आहे. दरम्यान, गोटाबाया राजपक्षे यांनी देश सोडला आहे. त्यांनी मंगळवारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोटाबाया राजपक्षे सध्या मालदीवमध्ये पोहोचले आहेत. येथून तो दुबईला जाणार आहे.

श्रीलंकेतील जनतेच्या निषेधानंतर राष्ट्रपतींना देश सोडावा लागला आहे. आर्थिक संकटात असताना संतप्त लोकांनी यापूर्वी राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला होता आणि पंतप्रधानांचे निवासस्थान पेटवून दिले होते.

आंदोलकांनी गाठले पीएम हाऊस

श्रीलंकेतील पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने आंदोलक पोहोचले आहेत. याठिकाणी मोठा सुरक्षा दलही तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, सुरक्षा दलांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत, तसेच श्रीलंकेच्या पश्चिम प्रांतात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे