शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत चीनच्या भ्याड हल्ल्याचा निषेध

काटेवाडी (बारामती), दि. १९ जून २०२०: शनिवारी ( दि १९ ) काटेवाडी येथे शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन शिवसेना फलकाचे पूजन जिल्हाप्रमुख राजेंद्र काळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय उत्साहात करण्यात आले.

शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून चीनने गलवन घाटी मध्ये भारतीय सैनिकांवर जो भ्याड हल्ला केला, त्याच्या निषेधार्थ काटेवाडी ता.बारामती गावांमध्ये शिवसेना शाखेच्या वतीने जिल्हाप्रमुख राजेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले.

यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने चिनी वस्तू जाळुन टाकून चीनचा निषेध करून जाळण्यात आल्या. तसेच चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रतिमात्मक फोटोचे ही यावेळी दहन करण्यात आले. या प्रसंगी मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी शिवसेना जिंदाबाद, भारत माता की जय, चीन मुर्दाबद च्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी शिवसेनेचे उप-जिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे, उप-तालुका प्रमुख सुभाष वाघ, कन्हेरी सरपंच सतीश काटे, शाखा प्रमुख युवराज काटे, ग्रामपंचायत सदस्य राहुल काटे, पांडुरंग काटे, उमेश गायकवाड, गणेश शिंदे, मा. ग्रा.सदस्य पप्पू काटे, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, माजी शाखाप्रमुख, त्याचप्रमाणे शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा