गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा गैरकारभाराचा निषेध, साताऱ्यातील सैदापूर ग्रामपंचायतीच्या कार्यालयात महिलांनी ओतले घाण पाणी

गैरकारभाराचा निषेध, साताऱ्यातील सैदापूर ग्रामपंचायतीच्या कार्यालयात महिलांनी ओतले घाण पाणी

सातारा ३० डिसेंबर २०२३ : सैदापूर ता.सातारा येथील स्वामी विवेकानंद नगरमध्ये गटार अस्वच्छतेबाबत परिसरातील महिला आक्रमक झाल्या. वारंवार तक्रार करूनही गटारी साफ होत नसल्याने, संतापलेल्या या महिलांनी गटारातील घाण पाणी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात ओतले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना अस्वच्छतेबाबत जाब विचारल्याने वादही झाला.

स्वामी विवेकानंद नगरमध्ये गटारे तुंबून दुर्गंधी पसरली आहे. काहींच्या घरात गटाराचे उपळे फुटल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरून रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याबाबत वारंवार स्वच्छतेची मागणी करूनही ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करून महिलांनी हे अनोखे आंदोलन केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ओंकार सोनावले

error: Content is protected !!
Exit mobile version