गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा जालना येथून आज पासून वंदे भारत एक्सप्रेस सुरू

जालना येथून आज पासून वंदे भारत एक्सप्रेस सुरू

जालना ३० डिसेंबर २०२३ : मराठवाड्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे, मराठवाड्यात वंदे भारत एक्स्प्रेसचं आगमन झालं असून, आजपासून ही रेल्वे जालना ते मुंबई अशी धावणार आहे. या ट्रेनला एकूण आठ डबे असणार आहेत.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं या ट्रेनचं लोकार्पण झालं आहे. ही ट्रेन जालन्याहून मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहे. या कार्यक्रमास विविध लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती. या रेल्वेमुळे मराठवाड्यातील नागरिकांना लवकर मुंबई येथे जाता येणार असून प्रवाशांनी ट्रेन बाबत आनंद व्यक्त केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : डॉ सचिन साबळे

error: Content is protected !!
Exit mobile version