पुणे महानगरपालिका कामगार युनियन कडून केंद्र सरकार विरोधात निदर्शने

3

पुणे, दि. ८ ऑगस्ट २०२०: ऑल इंडिया सेंटर कॉन्सिल ट्रेड युनियनच्या ‘कामगार वाचवा, लोकशाही वाचवा’ या कॅम्पेनला सहकार्य करत आज पुण्यातील पुणे महानगरपालिका कामगार युनियन या मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकार कामगार विरोधी व जनविरोधी धोरण राबवत आहे हा आरोप करत त्यांना विरोध करण्यासाठी ‘देशातील कामगार वाचवा’ या घोषणेखाली कर्मचाऱ्यांनी ही निदर्शने केली.

पुण्यातील सर्व कचरा रॅम्प, आरोग्य कोठ्या, वाहतूक विभाग ( घोले रोड, विश्रामबाग वाडा, कात्रज, कोथरूड)  कामगारांनी सोशल डिस्टनसिंग पाळत आज सकाळी आपल्या कामाच्या ठिकाणी निदर्शने केली. घोले रोड वरील कचरा रॅम्प मध्ये पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे अध्यक्ष कॉ. उदय भट स्वतः उपस्थित होते त्यावेळी ते म्हणाले, ‘कायम कामगारांना सातवा वेतन आयोग ग्रेड पे’ ची अंबलबाजवणी लवकर झाली पाहिजे. अत्यावश्यक सेवा पूरवत असताना २२ कर्मचारी कोरोना बाधित होऊन मृत्यूमुखी झाले आहेत. त्यांचा वारसा हक्क प्रमाणे नोकरी लवकरात लवकर मिळाली पाहिजे.

त्याचसोबत कंत्राटी कामगारांना कायम कामगार करण्यात यावे अश्या सर्व प्रश्नांसाठी युनियन लढा देत आहे. 
     
निदर्शनाच्या प्रमुख मागण्या :

  (१) मनपाने जाहीर केलेल्या”सुरक्षा कवच विमा”योजनेचा लाभ मयत सेवकाच्या वारसांना त्वरित मिळालाच पाहिजे.

  (२) कामगार विरोधी कायदे रद्द करा.

  (३) सातवा वेतन आयोगाची पुणे मनपा ग्रेड पे नुसार त्वरित अमलबजावणी करा.

  (४) सर्व कोव्हीड योद्ध्यांना सुरक्षा साधणे द्या.

  (५) कंत्राटी कामगारांना दिनांक २४/०२/२०१५ च्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार किमान वेतन त्वरीत मिळालेच               पाहिजे.
 
  (६) कंत्राटी सफाई कामगारांना कायम करा.
 

यावेळी पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने निदर्शनास जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच अध्यक्ष कॉ. उदय भट, युनियन पूर्ण वेळ कार्यकर्ता मयूर खरात इतर पदाधिकारी, सचिव व सर्व कामगार उपस्थित होते .

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा