हाथरस घटनेचा ‘महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या’ वतीने निदर्शने करून निषेध

हाथरस (उत्तर प्रदेश), दि. १ ऑक्टोबर २०२०: उत्तर प्रदेश मध्ये 19 वर्षीय मनीषा वाल्मिकी वर निर्घृण बलात्कार करण्यात आला व निघृण मारहाण केली, त्यात मनिषा वाल्मिकीचा दुर्दैवी अंत झाला. त्याच्या विरोधात आज ‘महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ,पुणे’ तसेच ‘श्रमिक महिला मोर्चाच्या’ वतीने निदर्शने करण्यात आली, व या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच आरोपींना त्वरित शिक्षा झालीच पाहिजे व मृतदेहाची विटंबना करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे ही मागणी केली.

उत्तर प्रदेशचे योगी सरकार दलित व दुर्बलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहे. भारतीय संविधानामधील समतेच्या तत्वाची उघडपणे पायमल्ली उत्तर प्रदेशमध्ये तसेच देशात केली जात आहे. याबाबत या वेळी तीव्र निषेध करण्यात आला.

निदर्शनात चंद्रकांत गमरे, मधुकर नरसिंगे, दिलीप कांबळे, निलेश चव्हाण, जयश्री भिसे, मीना खवळे, शोभा बनसोडे, वैशाली बारये, तानाजी रिकीबे, रामदास पवार, नितीन ससाणे, आकाश चव्हाण,अशोक खानविलकर, सिद्धार्थ प्रभुणे यांनी सहभाग घेतला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा