हिंगोली, दि.३० मे २०२० : हिगोंली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामा करीता बँकांकडून पिक कर्जाचे त्वरित वाटप करणे बाबत जिल्हाधिकारी यांना खा. राजीव सातव यांनी निवेदन दिले आहे. खरीप हंगाम अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे आणि शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा होताना प्रचंड अडचणी येत आहेत.
जिल्हयातील बँका शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीयकृत बँका तर शेतकऱ्यांना दरवाज्यात सुध्दा उभा करत नाही अशी परिस्थिती आहे.
या सदर्भात हिगोंली जिल्ह्यात फक्त ३. ५ टक्के कर्ज वाटप झालेले आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी अगोदरच अडचणीत सापडला असून शेतकऱ्याकडे पैसा नाही.
अशा वेळेस बँका कर्ज देण्यास तयार नसतील तर शेतकऱ्यांना खरीप पेरणी पासून वंचित रहावे लागेल, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर मोठ संकट उभे राहिले आहे. या संदर्भात आपण स्वतः पाठपुरावा करुन बँकांनी त्वरीत खरीप हंगामासाठी अधिकचे पिक कर्जाचे वाटप जलदगतीने करण्याच्या सुचना पाळाव्यात अशी विनंती खासदार अॅड राजीव सातव यांनी केली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: