गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा PS-2 ‘पोन्नियिन सेल्वन २’ सिनेमाची जगभरात ३०० कोटींची कमाई

PS-2 ‘पोन्नियिन सेल्वन २’ सिनेमाची जगभरात ३०० कोटींची कमाई

चेन्नई १० मे २०२३: २८ एप्रिल रोजी रिलीज झालेला, मणिरत्नम दिग्दर्शित, ऐतिहासिक ‘पोन्नियिन सेल्वन २’ या चित्रपटाने महिन्याभराच्या आतच वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर तब्बल ३०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. पोन्नियिन सेल्वन च्या पहिल्या भागाप्रमाणेच चित्रपटाचा दुसरा भागदेखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. हा चित्रपट जगभरात हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे.

मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेला पोन्नियिन सेल्वन चा पहिला भाग हा कल्की कृष्णमूर्ती यांच्या पोन्नियिन सेल्वन या कादंबरीच्या तीन भागांवर आधारित होता. तर, ‘पोन्नियिन सेल्वन २’ हा उर्वरित दोन भागांवर आधारित आहे. ‘पोन्नियिन सेल्वन २’ हा चित्रपट २०२३ मध्ये आलेल्या ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. ‘पोन्नियिन सेल्वन’ हा शब्द तमिळ भाषेतील आहे, ज्याचा अर्थ ‘कावेरी नदीचा पुत्र’ आहे. असे मानले जाते की जेव्हा राजराजा पहिला ५ वर्षांचा होता तेव्हा तो कावेरीमध्ये पडला आणि कावेरीनेच त्याला वाचवले. म्हणून त्याचे नाव पोन्नियिन सेल्वन म्हणजेच ‘कावेरी नदीचा पुत्र’ असे पडले.

कमल हसन यांनी चित्रपटाचे सुत्रधार नॅरेशन दिले आहे. ए. आर. रहमान यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. या चित्रपटाची निर्मिती मणिरत्नम यांच्या मद्रास टॉकीज आणि सुभास्करन यांच्या लायका प्रोडक्शन ची आहे.ऐश्वर्या राय बच्चन, विक्रम, तृषा, जयराम रवी, कार्ती, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलीपाल, प्रकाश राज, जयम, प्रभू, आर सरथकुमार, पार्थिवन, विक्रम प्रभू या कलाकारांनी चित्रपटात भूमिका निभावल्या आहेत.

चित्रपटात जयम (रवी मोहन) राजराजा चोला १ च्या भूमिकेत आहे तर ऐश्वर्या दुहेरी भूमिकेत आहे. ऐश्वर्या पझुवूरची राणी नंदिनी आणि तिची आई मंदाकिनी देवी या दोघींच्या भूमिकेत आहे. ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटात ऐश्वर्या राय आणि विक्रम हे कलाकार तिसऱ्यांदा एकत्र काम करत आहे. या आधी ‘रावण’ या चित्रपटातील ऐश्वर्या-विक्रमच्या जोडीला समीक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

error: Content is protected !!
Exit mobile version