गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा ‘आदिपुरुष’च्या ट्रेलरला मिळाले २१ तासांत ७० मिलियन व्ह्यूज, मोडला ‘RRR’ चा रेकॉर्ड.

‘आदिपुरुष’च्या ट्रेलरला मिळाले २१ तासांत ७० मिलियन व्ह्यूज, मोडला ‘RRR’ चा रेकॉर्ड.

मुंबई १० मे २०२३: मुंबईतील PVR जुहू येथे आयोजित एका ग्रँड इव्हेंटमध्ये ‘आदिपुरुष’चा बहुप्रतिक्षित ट्रेलर मंगळवारी रिलीज झाला. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर काही तासांतच त्याने ‘RRR’ चा रेकॉर्ड मोडित काढला आहे. यापूर्वी, RRR ने २४ तासांत ५१.१२ मिलियन व्ह्यूज मिळवले होते. तर ‘आदिपुरुष’ने अवघ्या ८ तासांत ५३.४० मिलियन व्ह्यूजचा टप्पा ओलांडला आहे. ‘आदिपुरुष’च्या या ट्रेलरला पहिल्या ५ मिनिटातच लाखाच्या वर लाईक्स मिळाले. यापूर्वी हा विक्रम ‘केजीएफ चॅप्टर २’ ट्रेलरच्या नावावर होता.

यूट्यूबवर ‘आदिपुरुष’च्या हिंदी ट्रेलरने २१ तासांत ५१ मिलियनहून अधिक व्ह्यूजचा टप्पा ओलांडला आहे. यू व्ही मोशनने शेअर केलेल्या तेलुगु ट्रेलरला १० मिलियन, तमिळ आणि मल्याळममध्ये ३.३ मिलियन आणि कन्नडमध्ये १.७ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

श्रीराम प्रेमी, भक्त आणि प्रभास चे असंख्य चाहते सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत आहेत. चाहत्यांच्या मते तेलुगुच नाही तर हिंदी प्रेक्षकांनाही प्रभास खूप आवडतो. प्रभास रेकॉर्ड तोडत नाही, पण तो नवीन रेकॉर्ड प्रस्थापित करतो. पण काहींच्या मते, प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत प्रभासपेक्षा हृतिक रोशन किंवा जूनियर एनटीआर अधिक चांगला शोभून दिसला असता. या बहुप्रतिक्षित चित्रपटाची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. तेंव्हा चित्रपट तर ब्लॉकबस्टर ठरणार यात काही शंका नाही.

गेल्या वर्षी निर्मात्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर अयोध्येत ‘आदिपुरुष’चा भव्य टिझर लाँच झाला होता. पात्रांच्या खराब लूकमुळे आणि खराब व्हीएफएक्समुळे हा चित्रपट चेष्ठेचा विषय ठरला होता. तसेच या चित्रपटावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत त्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. प्रेक्षकांनी आदीपुरुष च्या टिझरला प्रचंड ट्रोल केले. परंतु निर्मात्यांनी सुधारणा करत उत्तम ट्रेलर दिल्याची प्रेक्षकांची आत्ताची भावना आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

error: Content is protected !!
Exit mobile version