सोलापूर,दि. २३ एप्रिल २०२०: सोलापूर येथेे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) चंद्रकांत शिंदे यांनी गडचिरोलो मधील धानोरा तालुक्यातील सावरगाव पोस्टे मध्ये स्वतः ला गोळी मारून आत्महत्या केली. सदर आत्महत्याचे कारण हे ते आजारी असल्याचे आहे तसे त्यांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी नमूद केले आहे.
चंद्रकांत शिंदे हे गेली सात वर्षे आजारी होते. आजारपणामुळे ते पूर्ण कंटाळले होते. गेली सात वर्ष दुखण्यामुळे त्यांना व्यवस्थित झोप लागत नव्हती. दिवस रात्र झोप नसल्यामुळे आजारपणाच्या वेदना त्यांना असह्य झाल्या होत्या. असे त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.
त्यांच्यामागे त्यांची पत्नी व दोन मुले सागर व स्नेहा आहेत. पत्नी विषयी व मुलांविषयी आपली काळजी त्यांनी या सुसाईड नोटमध्ये व्यक्त केली आहे. आतापर्यंत आपल्या पत्नीने दिलेल्या साथीचे त्यांनी आभार मानले आहेत. तसेच आपल्या मुलांना आपल्या आईची काळजी घेण्यास सांगितले आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
आपल्या डोक्यात गोळी मारून त्यांनी आपला जीवन प्रवास संपवला आहे. या प्रकरणी कोणाला ही दोष देऊ नका असे सुद्धा त्यांनी नमूद केले आहे. सर्वांनी धीराने रहा, काळजी घ्या असे शेवटी लिहून त्यांनी या जगाचा निरोप घेतला. या सुसाईड नोटवर खाली त्यांची सही आहे.