पीएसएलव्ही-सी ५१ ची ॲमेझोनिया -१ आणि अन्य १८ उपग्रहांसह अवकाशात यशस्वी झेप

श्रीहरिकोटा, २८ फेब्रुवरी २०२१: सन २०२१ मध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) आपले पहिले ध्येय साध्य केले आहे.  आज सकाळी पीएसएलव्ही-सी ५१ आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून लॉन्च करण्यात आले.  पीएसएलव्ही-सी ५१ ॲमेझोनिया -१ आणि अन्य १८ उपग्रहांसह अवकाशात झेप घेतली आहे.
 इस्रोने निवेदनात म्हटले आहे की, पीएसएलव्ही-सी ५१ हे पीएसएलव्हीचे ५३ वे मिशन आहे.  या रॉकेटमुळे ब्राझीलच्या अ‍ॅमेझोनिया -१ उपग्रहासह अन्य १८ उपग्रहही अवकाशात पाठविण्यात आले आहेत.
 इस्रोच्या म्हणण्यानुसार हे रॉकेट चेन्नईपासून सुमारे १०० किमी अंतरावर असलेल्या श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आले आहे.  हे रॉकेट २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजून २४ मिनिटांनी प्रक्षेपित करण्यात आले.  शनिवारी सकाळी ८.४५ वाजता याची उलटी गती सुरू झाली.  ॲमेझोनिया -१ यशस्वीरित्या त्याच्या कक्षेत दाखल करण्यात आले आहे.
 पीएसएलव्ही (ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन) सी ५१ / ॲमेझोनिया -१ इस्रोची व्यावसायिक शाखा न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (एनएसआयएल) ची प्रथम समर्पित व्यावसायिक मिशन आहे.  ॲमेझोनिया -१ चार वर्षे डेटा पाठवत राहील.  हा उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी ब्राझीलमधील शास्त्रज्ञांची टीम भारतात आली.  इस्रोचे अध्यक्ष के शिवन म्हणाले की भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांसाठी ही अभिमानाची बाब आहे.  ते म्हणाले की ॲमेझोनिया -१ संपूर्ण ब्राझीलच्या वैज्ञानिकांनी तयार केली आणि विकसित केले.
 या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणून इस्रोचे विज्ञानमंत्री सतीश धवन अवकाश केंद्रात उपस्थित होते.  ते म्हणाले की, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. या लॉन्चिंगसाठी भारतापेक्षा  उत्तम जागा कोणती असू शकत नाही.
 अ‍ॅमेझोनिया -१ विषयी निवेदनात असे म्हटले आहे की, हा उपग्रह वापरकर्त्यांना रिमोट सेन्सिंग डेटा प्रदान करेल आणि ॲमेझोन प्रदेशातील जंगलतोड रोखण्यासाठी विद्यमान पायाभूत सुविधा आणि ब्राझीलसाठी विविध शेतीच्या विश्लेषणाला आणखी बळकट करेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा