कर्जत तालुक्यात जनता कर्फ्यू लागू

कर्जत, दि. १५ जुलै २०२०: कर्जत चे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज रथ यात्रेनिमित्त दिनांक १५, १६ व १७ जुलै असे तीन दिवस संपूर्ण कर्जत तालुक्यात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला असल्याची माहिती प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी दिली आहे. कर्जत हे संत श्री गोदड महाराज यांचे जागृत ठिकाण असून दरवर्षी आषाढ वद्य एकादशी दिवशी येथे मोठा रथोत्सव भरत असतो.

मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रथ यात्रा रद्द करण्यात आली असून दिनांक १६ जुलै रोजी यावर्षी रथयात्रा येत होती, त्यामुळे प्रशासनाने दिनांक १५ ते १७ जुलै असे तीन दिवस संपूर्ण कर्जत तालुक्यात जनता कर्फ्यू लागू केला असून या काळात आरोग्य सुविधा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. लोकांनी आपल्या घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी केले आहे.

दि १५ जुलै  आणि १७ जुलै  रोजी दूध, भाजीपाला, पाणी हे सुरू राहतील मात्र दि १६ जुलैला हे सर्व बंद राहिल, किराणा दुकाने तिन्ही दिवस बंद राहतील, आरोग्यसेवा, मेडिकल ३ दिवस सुरू राहतील, या दिवसात कर्जत तालुक्यात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार असून नियम मोडणाऱ्या वर कडक कारवाई करण्यात येणार असून गुन्हेही दाखल केले जातील त्यामुळे सर्वानी घरातच रहावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा