पुणे, ६ ऑगस्ट २०२०: पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यंदाच्या वर्षी सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांसोबत ऑनलाइन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
पिंपरी चिंचवड परिसरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. जर आपण गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला नाही तर, नागरिकांची प्रचंड गर्दी होऊ शकते. त्यामुळे, खबरदारीचा उपाय म्हणून सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच या काळात गणेश मंडळांना आवश्यक असणारे परवाने क्षेत्रीय कार्यालयांतर्गत उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहितीही पवार यांनी यावेळी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे