सासवडमध्ये रूग्ण वाढल्याने चार दिवस जनता लॉकडाऊन

5

पुरंदर, दि. २३ जून २०२०: पुरंदर तालुक्यातील सासवड येथील रुग्णांच्या संख्यांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या चार-पाच दिवसात रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे सासवड नगरपालिकेने काही उपाय योजना सुचवलेल्या आहेत. आज मंगळवार पासून चार दिवस जनता लॉकडाऊन सासवडमध्ये असणार आहे; अशी माहिती सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जवळक यांनी दिली आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याने विनोद जवळक यांनी जनता कर्फ्यूचे लोकांना आव्हान केले आहे. ते पुढे म्हणाले की गेल्या चार-पाच दिवसात सासवडमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. सासवड शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४ झाली आहे, उपचाराअंती ४ जण निगेटिव्ह आले आहेत, एकाचा मृत्यू झाला आहे, तर नऊ जण अॅक्टिव्ह आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

आज मंगळवारी सासवड मधील नगरसेवकांच्या कुटुंबातील तीन सदस्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात अधिक व्यक्ती असल्याने थोडी काळजी वाढली आहे. यांच्या थेट संपर्कातील लोकांची संख्या मोठी आहे. या ठिकाणच्या हाय कॉन्टॅक्ट मधील लोकांची यादी मोठी होत आहे. त्यामुळे पुढील उपाय योजना करण्याचे नियोजन केले आहे.

पुढील चार दिवस सासवड मध्ये जनता कर्फ्यू असणार आहे. यामध्ये सासवड शहरांमधील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद असतील. अत्यावश्यक सेवेमध्ये फक्त दवाखाने, टेस्टिंग लॅब, कृषी साहित्याची, औषध दुकाने फक्त वेळेत उघडतील. दुग्धालयात दुग्धजन्य पदार्थ विकण्यास मनाई असणार आहे. सकाळच्या वेळेत फक्त दूध विक्री करता येणार आहे. किराणा मालाची दुकाने व भाजीपाला विक्रेते किंवा फिरता भाजीपाला तीन दिवस बंद राहणार आहे. तरी कोरोनाचा वाढत्या रुग्णसंख्ये मुळे असे निर्णय घ्यावे लागत आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता या काळात नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच या तीन दिवसांत शासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे. शक्यतो घराबाहेर पडूच नये. अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर येऊ नये. लोकांनी नगरपरिषद प्रशासनास सहकार्य केल्यास सासवड शहर कोरोना मुक्त होऊ शकते.

सासवडचा जनता लॉकडाऊन हा २३ जून ते २६ जून या दरम्यान असणार आहे. सासवड शहरातील शासकीय कार्यालये त्यांच्या नियमीत वेळेत सुरू राहतील मात्र तालुक्यातून येणाऱ्यांनी सामाजिक आंतरचे तंतोतंत पालन करावे, तोंडाला मास्क लावून येणे गरजेचे आहे. लवकरच सासवड शहर कोरोना मुक्त होईल यासाठी नगरपालिका व तालुका प्रशासनाचे युद्ध पातळीवर शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. लोकांनी चिंता करू नये फक्त काळजी घ्यावी असे जवळ त्यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा