प्रलंबित निकालासंदर्भात योग्य तो न्याय दिल्याबद्दल उदय सामंत यांचे जाहीर आभार- सौ निशाताई बिडवे

6

विद्यापीठाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या व निकालाच्या प्रलंबित प्रकरणास वाचा फोडून योग्य तो न्याय प्रविष्ठ निकाल दिल्याबद्दल मा.ना. राज्यपाल महोदय व माननीय उच्च तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे ग्रॅज्युएट फोरम ऑफ महाराष्ट्रच्या राजाध्यक्षा सौ निशाताई बिडवे यांच्या मागणीस योग्य तो न्याय दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

सध्या संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाच्या संसर्ग महामारीच्या रोगात अडकल्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात दिसत होते. कारण त्यांच्या निकालासंदर्भात अद्यापही निर्णय होत नव्हता. म्हणून ग्रॅज्युएट फोरम ऑफ महाराष्ट्राच्या वतीने वाचा फोडण्यासाठी शासनास निवेदन दिले असता या निवेदनाची दखल घेत मा.ना. राज्यपाल महोदय व मा.ना.उच्च तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाऊ देता घेतला.

यमध्यामातून त्यांना योग्य तो न्याय व त्यांच्या सोयीप्रमाणे योग्य तो पर्याय प्राप्त करून दिला. त्यामुळे मा.ना.राज्यपाल महोदयांनी विद्यापीठा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा व त्यांच्या निकालांचा विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार जो निर्णय दिला गेला त्याचे खूप मोठ्या प्रमाणात स्वागत आहे.

त्यामुळे मा. ना. राज्यपाल महोदय यांचे व त्याचबरोबर उच्च तंत्र शिक्षण मंत्री मा.ना.उदय सामंतजी यांचे ग्रॅज्युएट फॉर्म ऑफ महाराष्ट्राच्या वतीने जाहीर आभार मानण्यात येते व अशाच प्रकारे आपण विद्यार्थ्यां संदर्भात योग्य तो निर्णय घ्याल हीच अपेक्षा, असे अभर मनात निशाताई बिडवे म्हणाल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रदिप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा