नवी दिल्ली, १६ सप्टेंबर २०२० : केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल नीशंक यांनी आज एन सी आर टी च्या वतीने माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या आगामी ८ आठवड्यांच्या शैक्षणिक दीनदर्शिकेच प्रकाशन केलं. कोरोना संकटामुळे सध्या चालू असलेल्या ऑनलाइन शालेय शिक्षणाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात विदयार्थ्यांना जास्त रोचक पद्धतीने शिकवायच्या विविध विषयासंदर्भात तंत्रज्ञान आणि समाज माध्यमांचा कसा वापर करायचा, याचं मार्गदर्शन या पुस्तिकेत केल्याच नीशंक यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
यामध्ये आकाशवाणी, दूरदर्शन, विविध समाज माध्यम, मोबाइल फोन यांचा समावेश आहे. मात्र ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही त्या ठिकाणी मोबाइलवरील एस एम एस आणि वॉइस कॉलचा वापर करून कसं शिकवायचं याचं मार्गदर्शनही या पुस्तिकेत करण्यात आल्याचं नीशंक म्हणाले.
या पुस्तिकेत नेहमीच्या पाठ्यक्रमातील क्रमिक पुस्तकांबरोबर विद्यार्थ्यांसाठी कला शिक्षण, शारीरिक शिक्षण, योग आणि विविध कौशल्य प्रशिक्षणाबाबतही मार्गदर्शन केलं आहे. यापूर्वीच प्राथमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी पुढील चार आणि आठ आठवड्यासाठी अशीच मार्गदर्शक दीनदर्शिका एन सी आर टी तर्फे प्रकाशित करण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: