पियूसीची प्रक्रिया आता ऑनलाइन

पुणे: राज्यातील वाहनांची प्रदूषण नियत्रंण चाचणीची (पीयूसी) प्रक्रिया आता ऑनलाईन करण्यात आली आहे. यामुळे बनावट कागदपत्राद्वारे काढल्या जाणाऱ्या पीयूसी प्रक्रियेला यामुळे चाप बसणार आहे.

याबाबत परिवहन आयुक्तांनी राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आता पीयूसी चाचणी ही केवळ ऑनलाइनच होत आहे. पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालया अंतर्गत १५ सप्टेंबरपासूनच ही प्रणाली सुरु असल्याचे त्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे.

याशिवाय पीयूसी चाचणीसाठी रस्त्यावर काढण्यात येणाऱ्या पीयूसी केंद्रांना परिवहन विभागाच्या ऑनलाइन प्रणालीशी जोडण्याचा निर्णय केंदीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार देशातील अनेक राज्यात ऑनलाईन पीयूसी केंद्रांना ऑनलाइन जोडण्यात येणार आहे काही ठिकाणी ऑनलाइन करण्यात आले आहे.

याबाबत परिवहन आयुक्तांनी ऑनलाइन पीयूसी अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्वच प्रादेशिक कार्यालयांना सूचना दिल्या असल्याचे सांगितले. पीयूसी केंद्र चालकांकडे यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याने ऑनलाइन प्रक्रियेला उशीर होत होता. मात्र आता अनिवार्य केल्यामुळे ही चाचणी ऑनलाइनच केली जाणार आहे. त्यामुळे राज्यात पियुसीची प्रक्रिया ऑनलाइनच पार पडणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा