बारामती, दि.२ जून २०२०: कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता पूलक मंच परिवार शाखा बारामती सर्वोत्कृष्ट शाखा पारितोषिक विजेते पूलक मंच झोन ७ अंतर्गत शाखेंचे झूम-अँप माध्यमातून ऑन लाईन अधिवेशन पार पडले.
बारामती येथे राष्ट्रीय जैन महिला जागृती मंचाच्या महामंत्री प्रियंका दोशी यांनी सांगितले की, कोरोना महामारी संकट व लोकडाऊन असल्याने पूलक मंच परिवार झोन ७ चे १५ वे क्षेत्रिय अधिवेशनचे आयोजन झूम अँपच्या माध्यमातून पूलक मंच परिवार शाखा बारामती यांनी झोन ७ अंतर्गत पुणे, औरंगाबाद, नातेपुते, निरा, लोणंद ,बारामती या शाखेचे अध्यक्ष, महामंत्री व दोन-दोन उत्कृष्ट कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या अधिवेशन मध्ये आचार्य पूलक सागरजी गुरुदेव यांनी सर्वांना ऑनलाईन दर्शन आशिर्वाद आणि मार्गदर्शन केले. गुरुदेव ऑन लाईन येताच ऑनलाईन असलेले सर्व शाखेच्या सदस्यांनी गुरुदेव यांना अर्घ्य समर्पित केले. गुरुदेवांच्या उद् बोधनानंतर गुरुदेव यांची आरती ऑनलाईन करण्यात आली.
या अधिवेशनचे मुख्य अतिथी प्रमुख समाज सेविका शोभा धारिवाल (पुणे) उपस्थित होत्या. तसेच पूलक मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद फांदोत, महामंत्री प्रदिप जैन, कार्याध्यक्ष सुनील काला, अंकित जैन, चन्द्रप्रकाश बौद तसेच महिला मंचाचे राष्ट्रीय अध्यक्षा मिना झाझरी, महामंत्री बिना टोंग्या, कार्यध्यक्षा पूनम विनायका तसेच राष्ट्रीय पूलक मंचचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
झोन ७ अधिवेशनात सहभागी झालेल्या सर्व शाखेचे अध्यक्ष, महामंत्री यांनी केलेल्या कामाचे तपशील देण्यात आले. त्यानंतर लगेच राष्ट्रीय कार्यकारीने सर्व शाखांचे कामाचे तपशीलवार करुन राष्ट्रीय अध्यक्ष/अध्यक्षा यांनी पारितोषिक जाहीर केले. पूलक मंच सर्वश्रेष्ठ शाखाचे मानकरी पूलक मंच परिवार शाखा बारामती यांना प्रदान करण्यात आले.
बारामती पूलक मंचचे मोरेश्वर पाठक व अमोल दोशी व महिला मंचाच्या संगीता वाघोलीकर, कीर्ती पहाडे यांना शाखेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय कार्यकारी यांनी विशेष सन्मानित करण्यात आले. अधिवेशनचे संचलन प्रियंका दोशी यांनी केले. अधिवेशन यशसवी होण्यासाठी डॉ.वर्षा कोठारी अध्यक्षा व अतुल गांधी अध्यक्ष प्रियांका दोशी महामंत्री धवल शहा (वाघोलीकर) महामंत्री यांनी सर्वांचे आभार मानले.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव