पुलस्त्य विज्ञान महोत्सव होणार ऑनलाईन

पुणे, ३ नोव्हेंबर २०२० : पुण्यातील आयुका अर्थात्, आंतर विद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्रामध्ये दरवर्षी पुलस्त्य विज्ञान महोत्सव आयोजण्यात येतो. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वीभूमीवर हा महोत्सव ७ ते ८ नोव्हेंबर दरम्यान ऑनलाइन साजरा होणार आहे. आयुकाच्या मुक्तांगण विज्ञान शोधिकेच्या इमारतीत हा महोत्सव भरेल.

महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक पु.ल.देशपांडे यांनी आयुकाच्या मुक्तांगण विज्ञान शोधिका या इमारतीच्या बांधकामासाठी भरीव आर्थिक मदत केली होती. त्याबद्दल कृतज्ञता म्हणून पु.ल.देशपांडे यांच्या जन्मदिनी अर्थात ८ नोव्हेंबर रोजी दरवर्षी पुलत्स्य महोत्सव आयोजण्यात येतो.यंदा ऑनलाइन महोत्सवाव्दारे विज्ञान विषयक माहिती जाणून घेण्याची संधी श्रोत्यांना मिळणार आहे.

तज्ज्ञांची व्याख्यानं ऑनलाइन आयोजित करण्यात आली आहेत. विषाणूंबद्दलची माहिती, सौरमालेतील घडामोडी, आयुकाच्या वैज्ञानिंकासोबत प्रश्नोित्तरांचे सत्र, नोबेल पारितोषिक २०२० या सारख्या विषयांवर तज्ज्ञांची व्याख्यानं होतील. त्यानंतर आकाश दर्शनाचा ऑनलाइन कार्यक्रम होईल. ७ नोव्हेंबरला दुपारी तीन ते रात्री आठ वाजेपर्यंत इंग्रजी भाषेत व्याख्यानं होतील.

तर आठ नोव्हेंबरची व्याख्यानं दुपारी तीन ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मराठी भाषेत असतील. अशी माहिती आयुकाचे प्राध्यापक समन्वयक डॉ.सुह्रद मोरे आणि मुक्तांगण विज्ञान शोधिका प्रमुख डॉ.समीर धुर्डे यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा