जिल्ह्याची तहान भागली पुणे जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरली!

यंदाच्या दमदार पावसामुळे पुणे जिल्ह्याने सुटकेचा निःश्वास टाकला आहे. जिल्ह्यातील एकूण २६ धरणांपैकी तब्बल १७ धरणे १००% भरली आहेत, तर उर्वरित ८ धरणेही काठावर आहेत. यामुळे, पुणे शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणी प्रश्न पुढील जूनपर्यंत पूर्णपणे मिटला आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण २१७.९९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे, ज्यापैकी ९९.९५% पाणी सध्या उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच काळात केवळ ६६% पाणीसाठा होता, त्या तुलनेत यंदा दुप्पट पाणीसाठा झाल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुठा, पवना, भीमा यांसारख्या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे, शेतीसाठी आणि पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे