पुणे, १४ मार्च २०२४: संघटनेचे सभासदत्व स्विकारल्याचा राग, आकस मनात धरून संघटनेचा सभासदत्व सोडण्याकरिता विधिद्य अनुचित कामगार प्रथांचा अवलंब व्यवस्थापनाकडून सतत होत आहे. मात्र, या बाबत सविस्तर माहिती पत्राद्वारे कळविलेले आहे. व अनुचित कामगार प्रथा थांबवून संघटना पदाधिकारी यांच्या समावेत चर्चा करण्याची विनंती केली होती.
पण या बाबत कोणतेही दखल न घेता अथवा कोणतेही चर्चा न करता उलट संघटना सोडण्याकरिता विविध दबाव तंत्राचा अवलंब करीत आहेत. कामगारांना कोणतेही कारण, पुरावा नसतांना संघटनेच्या प्रमुख सनासदांना नोटीस देणे, निलंबन करणे, चौकशी लावणे, अशा प्रकारच्या कृती चालु केलेल्या आहेत. कामगारांनी सनदशीर मार्गानी उपोषणाची नोटीस दिले असता मा. औद्योगिक न्यायालय पुणे येथे सर्व कामगारांच्या विरोधात तक्रारी दाखल केलेल्या आहेत.
संघटनेने कामगारांच्या तक्रारी, मागणी करिता मा. सहा. कामगार आयुक्त पुणे येथे दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या त्रिपक्षीय बैठकीमध्ये ४/५ तारखांमध्ये व्यवस्थापनाकडून कोणतेही अधिकारी उपस्थित राहीले नाहीत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड