पुणे जिल्हा टीबीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार: खासदार सुप्रिया सुळे

इंदापूर, दि. १८ जून २०२० : करोना या संसर्गजन्य रोगाचे जे रुग्ण सापडले आहेत व यामध्ये ज्या रुग्णांना टीबीचे आजार झालेले आहेत, त्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने घातक असणारा टीबी आजार पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

इंदापूर विश्रामगृह येथे तालुक्यातील शासकीय उपजिल्हा रुग्णालय, इंदापूर पंचायत समिती, इंदापूर तहसील कार्यालय, कृषी विभाग, विज वितरण कंपनी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग या सर्व विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक खासदार सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी पार पडली.

खासदार सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाले की, देशभरात कोरोना या दुर्धर आजाराने थैमान घातले असले तरीदेखील, राज्यातील सर्व विभागातील प्रशासकीय अधिकारी तसेच राज्य सरकार अधिकचे लक्ष या आजारावर केंद्रित केल्यामुळे, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. परंतु देशासमोर असलेल्या टीबीआजार, डेंगू अशा आजारांना मुक्ती मिळणे अत्यंत गरजेचे आहे. दरवर्षी टीव्ही या आजारामुळे अनेकजण मृत्युमुखी पडतात, त्यामुळे मी व खासदार अमोल कोल्हे अत्यंत मन लावून देशात पुणे जिल्हा टीबी मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

तसेच आरोग्य शिक्षणसाठी आगामी काळात काम करणार आहे. जरी सर्व प्रकारची दुकाने सुरू ठेवली तरीदेखील, प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून मास्क वापरला पाहिजे सुरक्षित अंतर ठेवले पाहिजे. जर खबरदारी पाळली गेली तर पुढे येणाऱ्या अडचणी येणार्‍या अडचणी टाळल्या जातात.त्यामुळे इंदापूर तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने आपले गाव व तालुका याचे आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी खबरदारी बाळगावी असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

या आढावा बैठकीत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की,इंदापूर तालुक्यातील प्रशासनाने अत्यंत चांगले काम केले असून आरोग्य विभाग रात्रंदिवस मेहनत घेत आहे.त्यामुळे आज पर्यंत भीती नव्हती. मात्र अचानक इंदापूर शहरातील काही कुटुंबांचा संपर्क बाहेरच्या जिल्ह्याशी आल्यामुळे संसर्ग वाढला आहे असे असले तरीदेखील, कोणीही काळजी करण्याची गरज नाही मात्र स्वच्छता व आंतर सुरक्षितता या दोन गोष्टींचे तंतोतंत पालन केले तर इंदापूर तालुका कोरोना मुक्त होण्यासाठी मदत होईल.

इंदापूर तालुक्यामध्ये आठ हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अत्यंत चांगली मेहनत घेतली, त्याच प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जवळपास वीस हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहेत. त्यामुळे सामाजिक जाणिवेतून तालुक्यांमध्ये गोर गरीब कुटुंबांना मदतीचा ओघ सुरू असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे पाटील, कार्याध्यक्ष अतुल झगडे, तसेच इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, तालुका आरोग्य अधिकारी सुरेखा पोळ, यांच्यासह तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा