पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज झाला आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित मदत देण्यासाठी १५ वैद्यकीय पथके, ८० डॉक्टर आणि २०० आरोग्य कर्मचारी तैनात केले आहेत.
मुख्य विसर्जन मार्गांवर आणि घाटांवर विशेष आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. दगडूशेठ हलवाई गणपती समोरच्या बेलबाग चौकात तीन आयसीयू बेडसह आरोग्य कक्ष उभारले आहे.
मिरवणुकीसाठी १२ दवाखान्यांमधील ओपीडी आणि कमला नेहरू रुग्णालयात १० बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. शहरात ३० रुग्णवाहिका सज्ज असून, गर्दीतील नागरिकांना तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे














































