पुण्याचे सभागृह नेत्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली अचानक भेट

पुणे, दि. १९ जुलै २०२०: अचानक रात्री पुण्याचे सभागृह नेते धीरज घाटे ह्यांनी १२.००ते २.०० या वेळेत पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट दिली. पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अंतर्गत डॅशबोर्डचे काम चालते याच्या माध्यमातून कोव्हीड पेशंटसाठी उपलब्ध असणाऱ्या खासगी व सरकारी रुग्णालय व बेडची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांना दिली जाते. पुणे शहरातील अनेक गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीत, महापालिकेला खाजगी रुग्णालयांकडून खोटी माहिती दिली जाते. अनेक वेळा मोठ्या रुग्णालयांमध्ये सामान्य माणसाला नकार घंटा वाजविली जाते. उपचारांपासून वंचित राहिल्याने, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर न मिळाल्याने काही कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचेही पुढे आले आहे या सर्व पार्श्वभूमीवर सामान्य पुणेकर कोव्हीड रुग्णांना खाजगी रुग्णालयात प्रवेश मिळावा उपलब्ध जागांची माहिती २४×७ कधीही मिळावी व उपचारा अभावी रुग्णांची फरपट होऊ नये म्हणून पुणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग काम करतो.

या ठिकाणी भेट दिली तेंव्हा रात्रपाळीसाठी डॉ.खेडकर व त्यांचे सहकारी काम करत होते. या भेटीच्या वेळी नगरसेवक अजय खेडेकर उपस्थित होते. धीरज घाटे ह्यांनी या दोन तासांमध्ये काम कसे चालते सांगताना म्हणाले, या दोन तासात मध्यरात्री सुद्धा अनेक रुग्णांच्या नातेवाईकांचे फोन आपत्ती व्यवस्थापन विभागात खणखणत होते आणि कोणी बेड देता का बेड…? असे म्हणत होते. पुढच्या काळात सामान्य पुणेकर असणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी बेड उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सक्रिय यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. महापालिका तर जबाबदारी घेईलच परंतु महाराष्ट्र शासनाने पण सामान्य गरीब गरजू रुग्णांची अडवणूक करणाऱ्या खाजगी रुग्णालयांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवावे त्यासाठी मी व माझे सहकारी पाठपुरावा करणार आहोत.

पुणे महापालिकेच्या माध्यमातून कोव्हीड केअर सेंटर्स चांगल्या पद्धतीने काम करत आहेत परंतु ज्यांना कोरोनाचा उपचार घेताना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर लागते आणि मग खाजगी रुग्णालयाचे दरवाजे अशा रुग्णांना खिशाचा अंदाज घेऊन प्रवेश द्यायचा का नाही ते ठरवतात अशा धंदेवाईक रुग्णालयांच्या विरोधात सामान्य पुणेकरांसाठी लढा द्यावाच लागेल…असे आवाहन ह्या वेळी केले .

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा