Pune Metro Expansion 12 New Trains Approved, Fleet to Increase to 46: पुण्यात होणारी वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन मेट्रोच्या विस्तारासाठी एक मोठं पाऊल उचलण्यात आले आहे . यासाठी नवीन १२ मेट्रो ट्रेनला मंजुरी देण्यात आली आहे . पुण्यात झालेल्या मेट्रोच्या विस्तारानंतर पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या हळूहळू कमी होताना दिसत आहे . यातच आता हि आनंदाची बातमी मिळाल्यामुळे सर्व प्रवासी सुखावले आहेत . मुख्यतः पुणे मेट्रोच्या PCMC ते निगडी व स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्ग विस्ताराला मान्यता मिळाली असून PCMC ते निगडी या मार्गिकेचे काम वेगाने सुरू आहे.
यातच स्वारगेट ते कात्रज मार्गीकेसाठी बांधकाम ठेकेदाराची नेमणूक करण्यात केली जाणार आहे. मात्र ह्या मार्गिका झाल्यानंतर त्यासाठी जाडा मेट्रो ट्रेन्स ची गरज पाहता या दोन आगामी मार्गांवरील कामकाजाला पाठिंबा देण्यासाठी, पुणे मेट्रोला १२ नवीन मेट्रो ट्रेनसाठी मान्यता मिळाली आहे . ह्या सर्व मेट्रो सेट खरेदीचा खर्च ४३०.५३ कोटी रुपये झाला असून पुढील महिन्यात या गाड्यांची डिलिव्हरी टप्प्याटप्प्याने केली जाणार असल्याची माहिती मिळते .
नवीन मिळणाऱ्या ह्या १२ मेट्रो ट्रेन्सची रचना हि अधिसारख्या मेट्रो सारखी असणार असून ह्या मेट्रोला ३ डबे असणार आहेत .पुणे मेट्रो टीमने ह्या सर्व ट्रेन्सची ऑर्डर टीटागड रेल सिस्टम्स लिमिटेड आणि टीटागड फायरमा यांच्याकडे दिली आहे . हे सर्व सेट्स पूर्णपणे ॲल्युमिनियमचे असणार असून ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत तयार केले जातील. सर्व रचना हि आधीच्या मेट्रो सारखी असणार असून यात वातानुकूलित डबे तसेच स्वयंचलित दरवाजे असणार आहेत .
या १२ नवीन गाड्या जोडल्याने, पुणे मेट्रोच्या एकूण ताफ्याचा आकार ४६ पर्यंत वाढणार आहे . यावेळी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितलं कि, पुणे मेट्रोच्या पीसीएमसी ते निगडी या विस्तारित मार्गांसाठी नवीन १२ ट्रेनची ऑर्डर महामेट्रोने दिलेली आहे. यामुळे या विस्तारित मार्गिकेचे बांधकामाचे पूर्ण झाल्यानंतर लगेच मेट्रो सेवा पुरवणे शक्य होणार आहे. तसेच स्वारगेट ते कात्रज या मेट्रो टप्प्याच्या कामाला गती मिळाली आहे . यामुळेच यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; तनया रेडकर
