पुण्याचा महेंद्र चव्हाण ठरला ‘महाराष्ट्र श्री’चा मानकरी

पुणे: राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत पुण्याच्या महेंद्र चव्हाण याने ‘अटल महाराष्ट्र श्री’ चा किताब पटकविला आहे तर मुंबईच्या अनिल बिलावा याने उपविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
तसेच मुंबईच्या अमला ब्रह्मचारीने सलग दुसऱ्यांदा ‘मिस महाराष्ट्र’ चा बहुमान पटकावला, तर महिलांच्या मॉडेल फिजिक प्रकारात उपनगरची दीपाली ओगले ‘मिस महाराष्ट्र’ ठरली आहे.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

■ ५५ किलो : अवधूत निगडे (कोल्हापूर), नीतेश कोळेकर (उपनगर), नितीन शिगवण (उपनगर)
■ ६० किलो : नितीन म्हात्रे (प. ठाणे), देवचंद गावडे (मुंबई उपनगर), प्रीतेश गमरे (मुंबई उपनगर)
■ ६५ किलो : दिनेश कांबळे (ठाणे), उमेश गुप्ता (मुंबई उपनगर), फैयाज शेख (सातारा)
■ ७० किलो : तौसिफ मोमीन, रोशन नाईक (पालघर), मनोज मोरे
■ ७५ किलो : सुदर्शन खेडेकर, सतीश यादव, महेश जाधव
■ ८० किलो : अनिल बिलावा, भास्कर कांबळे, राजू भडाळे (पुणे)
■ ८५ किलो : सुशील मुरकर (मुंबई), गणेश पेडामकर, हबीब सय्यद
■ ९० किलो : रसल दिब्रिटो (मुंबई उपनगर), दीपक तांबीटकर (मुंबई), संदेश सावंत (सिंधुदुर्ग)
■ १०० किलो वजनी गट : महेंद्र चव्हाण (पुणे), अरुण नेवरेकर (मुंबई), विशाल पखाले (सातारा).
■ १०० किलोवरील : नीलेश दगडे (मुंबई उपनगर), अक्षय मोगरकर (ठाणे).

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा