बाजारात भाज्यांची आवक वाढली, दर स्वस्त!

पावसाच्या उघडीपीमुळे पुणे मार्केट यार्डमध्ये भाजीपाला आणि फळांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे अनेक भाज्या स्वस्त झाल्या आहेत. रविवारच्या दिवशी १०० हून अधिक ट्रक फळभाज्यांची आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. टोमॅटो, काकडी, सिमला मिरची, गाजर आणि घेवडा यांच्या दरात ५ ते १० टक्क्यांनी घट झाली आहे.

तर, मेथीच्या ७० हजार जुड्यांसह पालेभाज्यांचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत. फळांमध्ये कलिंगड आणि खरबूज स्वस्त झाले आहेत, तर मागणीमुळे डाळिंब आणि सफरचंदाचे भाव वाढले आहेत. पितृपंधरवड्यामुळे फुलांची मागणी कमी झाल्याने फुलांचे दर निम्म्यावर आले आहेत. एकूणच, आवक वाढल्याने बाजारात ग्राहकांसाठी चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे