पुणे मेट्रोचा आणखीन एक टप्पा पार, पुण्यातील दोन स्टेशनमधून लवकरच धावणार मेट्रो

पुणे, १६ ऑगस्ट २०२२: देशातील मेट्रो सिटी मध्ये मेट्रो उभारण्याचं काम जोरात सुरू आहे. त्यातलं शहर म्हणजे पुणे. पुण्यातही मेट्रोचं जाळं तयार केलं जात आहे. बऱ्याच ठिकाणी मेट्रोची कामं होत आली आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील मेट्रोचं उद्घाटन केलं होतं. आता त्यानंतर आणखीन एक टप्पा पुणे मेट्रो ने पार केलाय. आझादी का अमृत महोस्तव आणि स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने शहरातील दोन मेट्रो स्टेशनवरील रन यशस्वी झालाय.

गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन आणि फुगेवाडी स्टेशन येथून आता मेट्रो सुरु करण्याचा मार्ग मोकळा झालाय. आता या ट्रायल रन नंतर लवकरच मेट्रो धावण्यास सुरुवात होणार आहे असं सांगण्यात येत आहे. एकीकडं गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन ते डेक्कन मेट्रो स्टेशन आणि फुगेवाडी मेट्रो स्टेशन ते दापोडी मेट्रो स्टेशन अशी पहिली ट्रायल रन घेतली आहे तर दुसरीकडं पुणे मेट्रोने प्रवाशी संख्येचाही यशस्वी टप्पा ओलांडला आहे. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ पर्यंत ७० हजारपेक्षा जास्त प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केल्याचं समोर आलं होतं.

येत्या काही महिन्यातच ही मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. येत्या काही महिन्यांत गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशनच्या पलीकडे सिव्हिल कोर्ट स्थानक आणि फुगेवाडी स्थानक येथून शिवाजीनगर मेट्रो स्टेशनकडे मेट्रो सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या कार्यरत असलेल्या गरवारे कॉलेज मेट्रो स्थानकापासून डेक्कन मेट्रो स्थानकापर्यंत आणि परतीच्या प्रवासाला सकाळी १०.३० वाजता सुरुवात झाली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा