पुण्यातील आमदार सुनील टिंगरे यांना कोरोनाची लागण

10

पुणे, ३ सप्टेंबर ,२०२० :
महाराष्ट्रात कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे यातच आज पुण्यातील वडगाव शेरीचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांना कोरोनाची लागण झाली आहे.

सुनील टिंगरे यांना काही दिवसांपूर्वी थोडी कणकण आणि ताप येत होता अशी लक्षणे दिसताच त्यांनी कुठलाही वेळ न घालवता कोरोनाची चाचणी केली असता त्यांची चाचणी ही पॉझिटिव्ह आली .

तसेच ते म्हणाले “मागच्या काही दिवासांमध्ये जे कोणी माझ्या संपर्कात आले होते त्यांनीही स्वतः सेल्फ कॉरन्टाईन होऊन काळजी घेतली पाहिजे’, असं सुनिल टिंगरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करतं म्हटलं आहे.

तसेच आज वडगाव शेरी येथील गणेशनगर मध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. त्याच्या पाहणीसाठी सुनिल टिंगरे ,नगरसेवक तसेच अधिकारी आणि गावातील स्थानिक नागरिक यांच्यासोबत चर्चा करत असताना सोशल डिस्टंन्सिंगचं पालन केलं गेलं नाही त्यामुळे अनेकांची चिंता वाढली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे