पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरील अपघातग्रस्ताचा वाचेल जीव; लोणावळाकरांचा दावा

10

मुंबई,‌ २६ ऑगस्ट २०२२: पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार व्हावेत तसेच त्यांचे जीव वाचावेत यासाठी लोणावळ्यातील वलवण येथे असलेल्या कुसगाव टोलनाक्याजवळील जागेत ट्रॉमा केअर सेंटर उभारवे अशी मागणी लोणावळ्याचे माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी केली आहे.

काही दिवसांपुर्वी शिवसंग्राम संघटनेचे नेते व माजी आमदार विनायक मेटे यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यु झाला. अपघातानंतर त्यांना एक तास तातडीची मदत मिळाली नाही असा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर हायवेवर होणारे अपघात व मृत्युचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वलवन यथील कुसगाव टोल नाक्याच्या शेजारील रस्ते विकास महामंडळाची वास्तू अनेक वर्षीपासून पडून आहे. प्रशस्त आणि मार्गालगत असल्याने या वास्तूचा सोईस्कर वापर होऊ शकतो. हजारो नागरिकांना या मार्गावर केवळ वैद्यकीय मदत न मिळाल्याने मृत्यु झाला आहे.

हे प्रकार रोखण्यासाठी मध्यवर्ती असलेल्या लोणावळा शहरामध्ये ट्रॉमा केअर सेंटर होणे गरजेचे आहे. असे सर्व नागरिक व श्रीधर पुजारी आणि सुरेखा जाधव यांनी व्यक्त केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर