कोरोना काळात पुणे महानगरपालिकेने घेतली होती PFI ची मदत

16

पुणे, २७ सप्टेंबर २०२२ : राष्ट्रीय तपास यंत्रणा ने वादग्रस्त पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) संघटनेच्या कार्यालयावर छापे टाकल्यानंतर २०० पेक्षा जास्त PFI पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. त्यानंतर संघटनेकडून राष्ट्रविरोधी आणि दहशतवादी कारवाया करण्यात आल्या आहेत. तर या संघटनेची पुणे महानगरपालिकेने कोरोना काळात करार केला असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे महानगरपालिकेने कोविड काळात २०२० मध्ये मृतांचा आकडा वाढल्याने मुस्लिम समाजातील व्यक्तीचे दफनविधी करण्यासाठी PFI ची मदत घेतली होती. पुणे महानगरपालिका आयुक्ताच्या आदेशाने जवळपास दोन महिने PFI संस्थेशी पालिका कनेक्ट होती.

कोरोना काळात मृतांचा आकडा वाढल्याने मुस्लिम व्यक्तीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पुणे महानगरपालिकेने PFI संस्थेची मदत घेतली होती. तर या वेळी पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता होती. त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून तातडीने PFI सोबत करार रद्द केला होता.

१३ एप्रिल २०२० रोजी हा करार केला होता, तर २ जून २०२० रोजी हा करार रद्द करण्यात आला होता.
त्यावेळी राझी अहमद हा व्यक्ती या PFI संस्थेचे काम पाहत होता तर तो सध्या NIA च्या ताब्यात आहे, तर ATS कडून अधिक तपास सुरू आहे.

टेरर फंडिंग दहशतवादी कारवाईच्या संशयातून NIA ने छापे टाकले आहेत. त्यामध्ये २०० पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात अली आहेत. त्यानंतर तपासून अनेक धकादायक खुलासे समोर येत आहेत. भारताला २०४७ पर्यंत इस्लाम राष्ट्र बनवण्याचं PFIचं उद्दिष्ट आहे, तसेच भाजप नेते आणि स्वयंसेवक संघाचे ( RSS) मुख्यालय त्यांच्या टारगेटवर असल्याचं तपासातून समोर आलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा