ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींसाठी पुणे महापालिकेची ‘विशेष’ समिती

21

पुणे १८ फेब्रुवारी २०२५ : ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व तक्रारी सोडवण्यासाठी पुणे महापालिकेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महापालिकेने ‘ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण समिती’ची स्थापना केली आहे. या समितीमध्ये आठ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, जेणेकरून ज्येष्ठांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण केले जाईल.

समितीचे अध्यक्षपद उपअभियंता मिलिंद करमकर भूषवणार आहेत.

ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेणे, त्यांचे मार्गदर्शन करणे आणि संबंधित विभागाशी समन्वय साधणे ही या समितीची प्रमुख कामे असतील. तसेच, तक्रारींची माहिती संबंधित विभागप्रमुखांना देणे, तक्रारींचा पाठपुरारा करणे आणि किरकोळ तक्रारींचे तातडीने निराकरण करणे यावरही समिती लक्ष ठेवणार आहे.

प्रत्येक मंगळवारी दुपारी ३:३० ते ५ या वेळेत अतिरिक्त आयुक्त कार्यालयात तक्रार निवारण दिन आयोजित केला जाईल.
या दिवशी ज्येष्ठ नागरिक आपल्या तक्रारी समितीसमोर मांडू शकतील. समिती सदस्यांकडून ज्येष्ठांना त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल.

समितीची भूमिका

  • ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज स्वीकारणे.
  • त्यांना मार्गदर्शन करणे.
  • तक्रार असलेल्या विभागाशी समन्वय साधणे.
  • तक्रारींची माहिती संबंधित विभागप्रमुखास देणे.
  • वर्ग केलेल्या तक्रारींचा पाठपुरावा करणे.
  • किरकोळ तक्रारींचे तातडीनं निराकारण करणे.
  • तक्रार निवारण झाल्यानंतर संबंधितांना कळविणे

या समितीच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या समस्या व तक्रारी मांडण्यासाठी एक हक्काचा मंच मिळणार आहे. तसेच, त्यांच्या समस्यांचे त्वरित निराकरण होऊन त्यांना न्याय मिळणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा